आला श्वास रिंगण
घाले
गेला श्वास विंझन
वारे
हळवा स्पर्श उष्ण
हलका
कळतो तरीही
अलिप्त परका
थांबे क्षणभर
दाटते वादळ
क्षणही उरतो
नावाला केवळ
हुळहुळणारा
त्रिवेणी संगम
मधुर गहिरे गूढसे
स्पंदन
मोर पिसारा फकिरी
हलका
स्पर्शे मस्तकी
देवूनी झटका
घडते काही घडल्यावाचुनी
विक्रांत आकार
पडल्यावाचुनी
विक्रांत
प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा