शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६

आकार मिटला



आकारी असुनी 
आकार मिटला
हरवूनी गेला 
पोकळीत ||१
दुरून लांबून 
प्रकाश वरून
खोल नळीतून 
घडे यात्रा ||२
श्वासांचे बंधन 
पडले म्हणून
आलो परतून 
उगाचच ||३
कसे नेले कुणी 
आणले परत
नच अवगत 
झाले जरी ||४
दावून झलक 
गेला प्रकाशक
अंधाराचे बीक 
मोडीयले ||५
विक्रांत निशंक 
होवूनिया थेट
चालू लागे वाट 
ठरवली  || ६

विक्रांत प्रभाकर तिकोणे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...