गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०१६

मुराळी चाहूल




करावा उपाय तुम्ही काही एक
माहेरास लेक बोलवावी ||
कशास कौतुके लोटले सासरी
नाती वरवरी जोडीयली ||
भ्रतार घराचे जरी सुख असे
मन त्यात नसे माऊलीये ||
पाठविले तुवा सोशीन हा भार
तुझाची आधार सर्वकाळ ||
परी आठवण फुटता मनात
बोलाव परत काही काळ ||
मग मी नांदेन तुजला स्मरून
येवू न देईन बोल काही ||
डोळ्यात काहूर विक्रांत व्याकूळ
मुराळी चाहूल घेत असे ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...