बोलव रे दत्ता
चालव रे आता
घालव रे दत्ता
मी पण हे ||
जाहलो उर्मट
करी कटकट
करावा ना वीट
परी माझा
घालवू नकोस
धुत्कारू नकोस
अडाणी भक्तास
रित्या हाती
असशी दयाळू
तू माय कृपाळू
प्रीत आळूमाळू
असो द्यावी
वर्षून कृपेसी
घेई हृदयाशी
ठाव पायाशी
देईं मज
कधी रागावसी
तू फटकारशी
धरुनी प्रेमासी
मी चुकता |
राहीन दारात
तुझिया पथात
घेवूनि हातात
प्राण माझे |
विक्रांत
प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा