सरतोय काळ कळल्यावाचून
देहात स्पंदन
नांदे गूढ ||१ ||
नामाचा धबाबा कधी
कोसळतो
कधी वाहवतो
गतायुषी ||२ ||
चालली गंमत
दुनिया वेगळी
अंतर पोकळी
दुणावली ||३ ||
देहाचे लोढणे
मनाचे खेळणे
अवघे मानणे
जाणीवेचे ||४ ||
पाहतो दुरून
पसारा सोडून
पाहणे कळून
पाहणारा ||५ ||
विक्रांत पुंजका
जाहला उर्जेचा
ठोकळा शून्याचा
घनदाट ||६ ||
विक्रांत प्रभाकर
तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा