दत्ताची साऊली
हाच माझा ध्यास जाहलो उदास
जगाप्रती ||
कृपाळू ती माय
करेल उपाय
जेणे अंतराय
मावळेल ||
देही चढविले
वस्त्रांचे भांडार
झाले घरदार
प्रदर्शन ||
सुटे प्रावरण
एकेक गळून
दिगंबर मन
घडावया ||
घडे जे जे काही
त्यांनी ठरविले
हाती सोपविले
सूत्रे तया ||
युगाचे सर्जन
मनाचे अमन
जन्म ओघळून
जातील ही ||
सुटो न पावुले
जीवन वाहणी
एवढी मागणी
अवधूता ||
http://kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा