तुझिया प्रीतीची
ऐकुनी कवणे
भक्तांची वचने
प्रियकर ||१
प्रेमाने
डोळ्यात आसवे भरती
उरी उमटती प्रेम
उर्मी ||२
अंतरी दाटते भावना
वादळ
अंगी वज्रबळ
संचारते ||३
जीवास आधार
श्रद्धेस जोजार
प्रेमास अपार
पूर येतो ||४
तुझेच ते दूत
हक्काचे हकारी
असे माझ्यावरी
ऋण त्यांचे ||५
तयांच्या कथेचे
करिता श्रवण
ओथांबले मन
वांच्छा करी ||६
विक्रांत
प्रेमाची गोष्ट एक होवो
दत्तराय देवो
आलिंगन ||७
विक्रांत
प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा