तिथे जावूनिया
परतून येणे
घडू नये कधी
शोधितो ते पेणे
ऐसे ध्यानी मनी
म्हणून धावतो
जागोजागी साऱ्या
संता विचारितो
देवाच्या मिठीत
सरावे जीवित
पंख जीवनाचे
हळूच मिटीत
कशाला असले
नकळे भोगणे
जगणे मरणे
येणे अन जाणे
आपण आपुणा
देहात चिणणे
वेदना सोसत
उगाच रडणे
नभाच्या कुशीत
धरेच्या उशीत
जाणावे गूढ या
जन्माचे गुपित
व्याकूळ आळव
विक्रांत चित्तात
कधी भेटतील
प्रभू दत्तनाथ
विक्रांत
प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
------------------------------------------------------
ऊपकारी स्वामी सन्नीध असता।सतशिष्य वाहे वृथाच चिंता॥
उत्तर द्याहटवाdhnyavad
उत्तर द्याहटवा