मनाच्या एकांती
तुझी याद येते
कानात गुंजते नाव
तुझे ||
स्वप्नाचे आकाश
भरून मानस
तुझा सहवास अनुभवे
||
कधी येता जाग
कुण्या मध्यरात्री
तुझे भास गात्री
जाणवती ||
तुझे वेड तूच
देवून जागवी
भ्रमिष्ट चाळवी
जन्म माझा ||
आता हरू द्यावे हे
माझे मी पण
जगण्या कारण तूच
होई ||
विक्रांत विज्ञानी
झाला दत्तखुळा
म्हणे गोतवळा
शिकलेला ||
विक्रांत प्रभाकर
तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा