************
आलो आळंदीत झालो आनंदीत देव समाधीत पाहियला
भारावले तन भारावले मन
गर्जे कणकण ज्ञानदेव
जिवलग भेटी हरपले भान
हृदयात गाणं गुंजो आले
माऊली माऊली ज्ञानाई माऊली
अंतरी फुटली मेघमाला
विक्रांत लेकरू माती मळलेले
परी झेपावले कुशीमध्ये
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा