शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२६

तुझ्यामुळे

तुझ्यामुळे
*********
माझ्या मधले   शब्द कोवळे 
झाले मोकळे    तुझ्यामुळे 

कधी कुठली    फांदी झुकली 
बहरून आली   तुझ्यामुळे 

खोल अंतरी     होत्या गोष्टी 
आल्या ओठी    तुझ्यामुळे 

माझे मी पण    आले उमलून 
जीवन घेऊन    तुझ्यामुळे 

तुज ना कळले   स्पर्श रूजले
अन हे घडले      तुझ्यामुळे

या ओठावर      अजून अंमळ 
होते थरथर      तुझ्यामुळे 

गात्र वीणेत      किंचित कंपण
जीवित अजून   तुझ्यामुळे

तव स्मृती मी    जगतो म्हणूनी
जिवंत अजुनी   तुझ्यामुळे
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दरवळ

दरवळ  ******* शब्द काही दिलेस मला  तू  रांगोळीत रंग भरतांना  अन् स्वप्न नव्या जगण्याचे तम प्रकाशी विरघळतांना ॥ थरथरले मृदू ओठ तु...