दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२६

आधार

आधार
*****
दत्त जिवलग सोयरा धायरा 
झाला या पामरा पाठबळ .१

 त्याने मज धीर आला समरात
संसारी वाहत असताना .२

 घडे देणे घेणे लोक उपचार
 चाले व्यवहार तया कृपे .३

अन्यथा कसले मजलागी ज्ञान
न कळे वर्तन जगताचे .४

दत्त चालविता म्हणून चालतो 
जगती दिसतो संभावित .५

अन्यथा जगतो निरर्थ केवळ
जगण्याचा आळ वाहविता .६

ऐसा वृक्ष थोर केला उपकार
देऊन आधार  पामरा या . ७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

निरोप

निरोप ( विसर्जन) ***** आलास आता आताच  अन्  पुन्हा निघालास  कसे दिवस उलटली  कळले नाही कुणास ॥१ तुझे स्थान हृदयात  जरी का नित्य  अ...