शनिवार, ३१ जानेवारी, २०१५

आता कैसे गाऊ





आता कैसे गाऊ
सांग तुझे गुण
चाकाटले मन
शब्दहीन ||१
बोलू जाय तरी
श्वास कोंदाटून
राही घोटाळून
अंतरीच ||२
लिहू जाय तरी
जातात वाहुनी
अक्षरे भिजुनी
आसवांनी ||३
बोललो तितुके
तुझेच कौतुक
दुबळा वाहक
वावटळी ||४

विक्रांत प्रभाकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फुंकर

फुंकर  ****** माझिया प्राणात घाल रे फुंकर विझव अवघा लागलेला जाळ  मग मी जगेन होऊन निवांत  तुझ्या सावलीत दत्ता दिनरात  सगुण निर्गु...