मला माहित आहे
माझ्या कविता
लाईक
करणाऱ्या मित्राला
माझी एकही कविता
आठवणार नाही .
तरीही मी कविता
लिहीतच राहणार
अन तो त्यांना
लाईक करत राहणार .
माझ्या कवितेशी फारसे
देणे घेणे नसते
त्याला
त्याला कविता
कळावी
असे म्हणणे नसते
माझेही
पण त्याचे लाईक करणे
थाप असते खांद्यावर
चालू दे रे तुझे म्हणणारी
मैत्रीला दृढ
करणारी
..........
अन माझे कविता
लिहिणे
म्हणजे तरी दुसरे
काय असते
नर्मदेत दिव्याची
होडी सोडणे असते
साऱ्याच हळू हळू
वाहत
दूर दूरवर जातात
काही छान पेटतात
तर काही क्षणात विझतात
पण मन भरत नाही
अन दिव्यांनी
नटलेला प्रवाह
किती सुंदर दिसतो
.
सार्थक होते
माझ्या शब्दांचे.
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा