आम्हा
वाटते आम्ही लिहितो
शब्द
काव्य महान प्रसवतो
खरच
सांगतो मित्रा तुजला
लिह्णारे
ते आम्ही नसतो
ही तो कृपा सरस्वतीची
जगत्रयातील
चैतन्याची
कळसुत्रा
मग तमा कशाची
स्तुतीची
वा त्या टीकेची .
जया
आवडे त्यांनी घ्यावे
नको
त्यांनी नाकारावे
ज्ञात
अज्ञात शब्द सरिता
तिने
आपुले वाहत राहावे .
शब्द
पहिला कुणी सृजला
शब्द
नवा का तयार झाला
अगणित
वृक्ष लता सुमने
अनंत
रुपी वसंत न्हाला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा