मरे भिकारी
भिकाऱ्या गत
मरे राजाही
सारे कवळत
परि असेही
दिसते कौतुक
मरे संन्यासी
खरे हासत
देहा कधीच
होते टाकले
मनही होते
पुसून गेले
चितेवरच्या
सांगती ज्वाला
आग मिळतसे
पुन्हा आगीला
जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
फुंकर ****** माझिया प्राणात घाल रे फुंकर विझव अवघा लागलेला जाळ मग मी जगेन होऊन निवांत तुझ्या सावलीत दत्ता दिनरात सगुण निर्गु...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा