स्वप्न लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्वप्न लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२६

स्वप्नझाड

स्वप्न झाड
********
तशी तर तू भित्रीच 
पण एक धाडस केलेस
चांदण्याचे एक झाड 
माझ्या दारी लावलेस
झाड तुझे होते की माझे 
मला कधीच कळले नव्हते 
कित्येक रात्री पण मनाचे 
स्वप्न सोनेरी झाले होते
ते जादूचे झाड परंतु सदैव 
तुझ्याच सोबतअसायचे
तू म्हणशील तेव्हा अन् 
लावता लगेच रुजायचे
एक दिवस म्हटलो मी 
राहू दे ना हे असेच सदाचे
म्हटलीस तेव्हा दबकत तू ,
खरेच सांगते हे नाही माझे 
जेव्हा मी स्वप्नी शिरते 
तेव्हाच फक्त ते इकडे येते 
जाग येता पाहते तर 
हे झाड कुठेच कधी नसते
तू स्वप्न अन हे झाडही 
आलात माझ्यामध्ये मोहरून .
पण प्लीज ,
माझ्या या स्वप्नातील स्वप्नात 
जाऊ नकोस मला विसरून
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

स्वप्नझाड

स्वप्न झाड ******** तशी तर तू भित्रीच  पण एक धाडस  केलेस चांदण्याचे एक झाड  माझ्या दारी  लावलेस झाड तुझे होते की माझे  मला कधीच ...