दिपावली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दिपावली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२६

दिवाळी

दिवाळी 
******
अंगणात सजे रांगोळीचे नक्षी 
दिव्यातून उडे प्रकाशाचे पक्षी 

सुखाच्या शोधात जीवाची पाखरे 
धावती वेचती कणकण सारे 

नवीन कपडे मधुर मिठाई 
भेटी गाठीतून नात्यांना झिलाई 

त्याच त्या जीवना मिळे संजीवन 
भरती जखमा कळल्या वाचून 

सणांचा हा राजा आहे रे दिवाळी 
दोन्हीही हातांनी आनंद उधळी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

दिवाळी

दिवाळी  ****** अंगणात सजे रांगोळीचे नक्षी  दिव्यातून उडे प्रकाशाचे पक्षी  सुखाच्या शोधात जीवाची पाखरे  धावती वेचती कणकण सारे  नव...