मंगळवार, ७ मे, २०२४

मेघ सावळी

मेघ सावळी
********
मेघ सावळे व्याकुळ ओले
जेव्हा  निळ्या नभात जमले
हर्षनाद तो गंभीर गहीरा
ऐकून वेडे मन बावरले

शामल रूप लोभसवाने 
मनात आले आकाराला 
काळवेळ मग हरवून गेला
उभी ठाकले मी यमुनेला

झर झर सर आली धावत 
लगबग जशी तुझ्या पावलात 
चिंब चिंब मज धुंद भिजवत
वेढूनिया जल निळ्या मिठीत
 
तरू वेली फळ पुष्प आघवे
तू च होवून होते ठाकले
मग मीपण माझे हे इवले
झोकुनिया तयात दिधले

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वामी शरण

स्वामी शरण ******** आपल्या भक्ताशी सदा सांभाळीशी  हृदयी वसशी स्वामी राया ॥१ ऐहिक कौतुके किती एक देसी सुखात ठेवीसी सर...