शनिवार, ४ मे, २०२४

खूण

खूण
****
मनाच्या कपाटी जपून ठेवला
बंद कुलुपात कुणा न दाविला ॥

तोच तो राजस सुंदर चेहरा 
अति मनोहर लोभस हसरा  ॥

कुणी ग चोरला कुणी ग लुटला 
होता जन्मभर खजिना जपला ॥

जाऊन गुरूला वृत्तांत वदला
वंदून पदाला उपाय पुसला  ॥

तोच ग अंतरी प्रकाश दाटला 
 सखा सर्वव्यापी सर्वत्र दिसला ॥

देई ज्ञानदेव खुण ती मजला
भ्रांतीत पडला जीव सुखावला ॥ 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रुतून बसणं

रुतून बसणं ******** जर मी तिला म्हटलं की  मला अजूनही तुझीच स्वप्न पडतात  तिला हे खरं वाटणार नाही कदाचित अजूनही स्वप्नात तोच वेडे...