********
करी रे मोकळा माझ्यातून मला घडवी दयाळा कृपेचा सोहळा
सरो व्यवहार सर्व हा संसार
नको उपचार नको उपकार
निर्बंध निराळा मेघ मी मोकळा
हिंडत राहावा माईचा किनारा
नको मनी खंता दाणापाणी चिंता
ओढून आकाश निघावे दिगंता
दत्त नाम घ्यावे स्वरुपा स्मरावे
गुरु सेवेलागी नित्य रत व्हावे
याहून विक्रांता अन्य नको काही
सर्वकाळ चित्त राहो तुझ्या पायी
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .