बुधवार, २७ जुलै, २०१६

दत्ताच्या चरणी






दत्ताच्या चरणी  
विक्रांत मूर्धनी
ओघळून पाणी
विसावले  ||
कृपा की करुणा
क्षमा संवेदना
काहीच कळेना
पदलीना ||
मूर्तीत अमूर्त
चैतन्य प्रकट
भव्य आकाशात
उमटले ||
साधनेत रत
डोळीयात दत्त
नाम स्मरणात
गेले क्षण ||
जागृती थिजली
स्वप्नात भिनली
क्षण उजळली
अंतर्बाह्य ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...