गुरुवार, २१ जुलै, २०१६

ओंगळ नजर






स्त्री देहावर
रेंगाळणारी
ओंगळ नजर
वासनेचे जहर
जर उतरले
माझ्याही
डोळ्यात
तर
हे कृतांता
मज अंध कर
कायमचे
तत्क्षणीच
तू कृपेचा
होत सागर

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुझ्यामुळे

तुझ्यामुळे ********* माझ्या मधले    शब्द कोवळे  झाले मोकळे     तुझ्यामुळे  कधी कुठली     फांदी झुकली  बहरून आली    तुझ्यामुळे  ख...