बुधवार, २७ जुलै, २०१६

मरेस्तोवर




मातीच्या देहाला
जपावे किती
मातीस मिळणे
मातीला अंती
चार पाच सहा
दशके जीणे
इथले गणित
सदैव उणे
आधिव्याधी कधी
प्रारब्ध आड
वाढते आणिक
मरते झाड
जग रे माणसा
मरेस्तोवर
नाव गाव टिंब
नसे नंतर
विक्रांत सोड रे
व्यर्थ पसारा
आता तरी आत
फिर माघारा

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विठ्ठल दर्शन आषाढी

विठ्ठल दर्शन (आषाढी) ***************** पाहिला मी देव उभा विटेवर  सावळा सुंदर मनोहर पाहिला ना वेष नच वा मुकुट  चंदनाचा नीट गंध उभ...