परिक्रमा
*******
अन्नक्षेत्री जेवत आहे
अन् अर्थ या जीवनाचा
माईकडे मागत आहे
प्रचंड पाणी प्रवाहाचे
नितळ निळे कुठे तर
गढूळ मातकट कुठे
तसे पाहणे घडत आहे
कधी ती दऱ्या मधून
कधी घाटातून वाहत आहे
निशब्द एकांत गूढ किनारी
डोळ्यातून ओघळत आहे
मी तिला शोधत आहे
ती मला पारखत आहे
कळत नाही मला की
काय कसे घडत आहे
देह घर हे वेदनांचे
पुढे पुढे रेटत आहे
उघडेल दार कृपेचे
श्रद्धा दृढ होत आहे
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा