जैसा गरुड तो नेतो उचलून
मासा अलगत पायी पकडून
तैसे मजला घेई ओढून
दत्तराज खग बलिष्ठ होऊन
सुखासीन मी या जगतात
हरवून गेलो माझ्या खेळात
किती काळ ते माहित नाही
पाणी इथले संपत नाही
कधी तरी पण जावे उजळून
तम गोठले हे प्रकाश होऊन
जल पृष्ठावर येतो उसळून
लक्ष पुन:पुन्हा घेतो वेधवून
जगतो विक्रांत भिजल्यावाचून
तव स्वरूपात जाण्या हरवून
त्या मत्स्याचे
भाग्ये इछून
जे सुटले या जन्म
मरणातून
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा