मंगळवार, १४ मे, २०१९

मागितले दत्ता




मागितले दत्ता
*************
मागितले दत्ता
मागणे नसून
मागणे सरु
तुची होय ॥

प्रकाश पाझर
चैतन्य जागर
भक्तीची अक्षर
होवो ओठ  

सुटावे जगत
आणि सोडवण
कृपेची किरण
जन्म सारा

अनित्याच्या लाटी
फेना न गणती
परि मोठी
तया पोटी ॥

प्रभू अंतर्यामी
वसे कणोकणी
जाणे विनवणी
प्रत्येकाची ॥

जावो माझेपण
उरो तुझे पण
विक्रांत कारण
असण्याचे ॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

*****


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गाणे

गाणे **** काही उरली सुरली  माझी निरोपाची गाणी घेई उचलूनी हाती देई दूर वा सोडुनी ॥१ मुठ करता रिकामी  मुठ मुठ न उरते  होते साठवले ...