दत्त गाणं हे
येई मुखातून
दत्त वदवून
घेई सुखे
अथवा काय ती
माझी हिंमत
मजला किंमत
जगामाजी
दत्तक प्रेमे
शब्द कोवळे
हृदयी फुलले
धन्य झालो
तुझाच वाहक
दयाघना
मी
सदैव ठेवूनी
घेई पायी
नकोस देऊस
व्यर्थ अभिमान
वक्र कमान
ताठयाची ती
नाव जरी तव
पदात ठेवतो
फूल मी होतो
शब्दातले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा