तुझ्यावाचून
*******:
सरला दिन तुझ्या
वाचून
व्यर्थ जगलो
जन्मा येऊन ॥
भांडी घासली या
जगताची
कचरा पाणी गेले
वाहून ॥
तेच हिशोब
पुन्हा मांडले
त्याच खर्चात मन
सांडून ॥
कळते मजला
माझ्यावाचून
जग चालते युगे
होऊन ॥
तरीही चाले
उठाठेव ही
चक्र कुठले पायी
बांधून ॥
नकोस जावू असे
सोडून
दत्ता भगवे
स्वप्न मोडून ॥
माळावरती पडली
काडी
तुझ्या धुनीत
जावी जळून ॥
जळता देह या
जन्मातून
तुझाच दत्ता
जावो होऊन ॥
आस लागली
विक्रांतला या
आतूर काया जावी
मिटून ॥
©
डॉ..विक्रांत
प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा