बुधवार, १ मे, २०१९

दत्त पंथ



दत्त पंथ 
****:
होई धर्माला आधार
दत्त अवतार थोर
भुक्तीमुक्तीसाठी जनी
पंथ रचिले अपार ॥

नाथ अवधूत नागा
महाभाव अवलिया
धर्मपंथ मिळवून
केले ज्ञानी अवघिया ॥

मुख्य वैराग्य भूमिका
धन मानले मृत्तिका
किती मोक्षा लावियले
जागे करून विवेका ॥

दत्त पाया अध्यात्माचा
जथा जागे झालेल्यांचा
दत्त धर्म तो सेवेचा
जीवी दडल्या शिवाचा ॥

दत्त नाथ अनाथाचा
असे आसरा खुळ्यांचा
दत्त निर्धास्त निवारा
उधळल्या वासरांचा ॥

दत्त विक्रांती जाणला
माथ्यावरची धरला
जन्ममरणी वाहता
मला किनारा भेटला ॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वीकार

स्वीकार  ******* करी रे स्वीकार माझा मायबापा आगा दयारूपा माझे म्हणा  नाही भोळी भक्ती नाही शक्ती मती  परी उपरती खरी असे  व्यर्थ म...