शनिवार, ११ मे, २०१९

दत्त चित्ताचा अंकुर




दत्त चित्ताचा अंकुर
************

आला मायेला भेदून
दत्त चित्ताचा अंकुर
खोल जीवात दडली
स प्रकाश आतूर 

मोक्ष वसंता चाहुल
दत्त मनाचा मोहर
भक्ती रसात ओघळे
गंध मदिर सुंदर ॥

दत्त जाणिवेचे फुल
येई हळू उमलून
माझे पणात आलेला
मज मी पणा कळून 

नाम गंधात भिजली
दत्त वायूची लहर
माझ्या चित्तात वसली
प्रभू प्रेमाचीच कोर 

तृष्णा तापल्या जीवास
दत्त मृगाचा पाऊस
तया एकरूप होता
सरे जीवनाची हौस  

दत्त दिसतो जनात
दत्त फिरतो वनात
दत्त कृपाळू केवळ
सदा विक्रांत मनात 

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

**:::


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीपाद सखी

श्रीपाद सखी *********** स्वप्न हरखले डोळीया मधले  स्वप्नास लंघुनी स्वप्न हे उरले ॥१ नभात लक्ष दीप उजळले  अन चांदण्याचे तोरण जाहल...