उदास हे मन
************
उदास हे मन
दत्ता तुज विन
कृपाळू येऊन
शांत करा ॥
इतुके न पुण्य
माझिया गाठीस
तव स्वरूपास
प्राप्त व्हावे॥
फक्त एकदाच
एक क्षणभर
सरावे अंतर
तव स्पर्शी ॥
सारी होरपळ
मिटो भगवान
जीवनाचे गाण
उमलून॥
विक्रांत जगात
चालला वाहत
किनारा शोधत
जिथे तू रे ॥
***::
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा