शुक्रवार, २९ जुलै, २०१६

कृष्णा..!




कृष्ण 
*****

माझेपण तुला घे रे
तुझेपण मला दे रे 
हे कृष्णा मनमोहना 
तुझे खूळ मला दे रे

आकाशात दाटलेले
होवूनिया जळ ये रे
पानोपानी बहरले
आनंदाचे पळ दे रे

चालतांना पावुलात
रामकृष्ण रव दे रे
पहुडता माळावरी
निळे निळे खेव दे रे

सावळेसे स्वप्न तुझे
मिटावे ना कधी बरे
प्राणात या एकारले
भास तुझे व्हावे खरे

मावळून भास सारे 
मौन जाग येवू दे रे
अन्य काही नको फक्त 
प्रेम भक्ती उरू दे रे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

डॉ. मनीष दोशी Dy MS (I/C)राजावाडी हॉस्पिटल (निवृती दिना निमित्त)

डॉ. मनीष दोशी Dy M.S.(I/C) राजावाडी हॉस्पिटल (निवृती दिना निमित्त) ***************** खरे जे डॉ .मनीषला ओळखतात  त्यांना सांगायची ...