सोमवार, १३ जानेवारी, २०२०

बाटगे सत्य





बाटगे सत्य .
***********
बाटल्या सत्याला
सत्तेचा आधार
मागते होकार
व्यासपीठ ॥

बाहेर मातीचे
आतल्या गाठीचे
परक्या निष्ठेचे
बाजिंदर ॥

पुजले सापांना
तरी ते डसती
हिशोब मागती
नसलेला ॥

आम्ही ते उदार
सहिष्णू बापाचे
वाहतो चुकांचे
पाप माथी ॥

विक्रांत कर्माचा
मानव धर्माचा
चावत्या डासाचा
परी शत्रू ॥
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

https://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...