देह फोलपट
***********
देवा सरु दे माझे मी पण
आणिक
उरु दे तू तुझे पण
माझेपण
होता कधी तुझेपण
नकोस
ठेवू रे वेगळे काढून
ठावुक
मजला तुझा भक्त सोस
द्वैताचे
आवडी घेतोस तू वेष
होवुनिया
भक्त जगा विचरसि
मायेच्या
खेळात विश्व गुंतविसी
हवे तर
ठेव तू ते ही पोर पण
जाणून
सारे दे नेणीवे भरून
मिटो
तळमळ तिमिर अज्ञान
स्वरुपी
तुझिया मला मी पाहून
मग वाहु
दे दत्ता देह फोलपट
सजुन
जगात नावाने विक्रांत
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा