गुरुवार, १० जानेवारी, २०१३

लिहायचे कुणासाठी




लिहायचे कुणासाठी

लिहायचे कश्यासाठी

शेवाळल्या तळ्याकाठी

जड जड झाली दिठी

सुकलेल्या पानावरी

उदासली सांज सारी

मनातली अक्षरे ही

मनाआड गेली सारी

वेदनांत मरतांना

वेदनांचे गाणे झाले

ऐकतांना दूर कुठे

कुणा डोळी पाणी आले



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुझ्यामुळे

तुझ्यामुळे ********* माझ्या मधले    शब्द कोवळे  झाले मोकळे     तुझ्यामुळे  कधी कुठली     फांदी झुकली  बहरून आली    तुझ्यामुळे  ख...