भाव भोळा आणू नका
व्यवहारात भावनेचा
घोळ उगा घालू नका ll १ ll
देव सदा उभा आहे
पण हाक देवू नका
जन्माची वाट लागेल
भुली त्याच्या पडू नका ll २ ll
हळू तो मनी शिरता
जग निरर्थ दिसेल
कमावलेले अवघे
मग नकोसे वाटेल ill ll ३ ll
माझे जरा नीट ऐका
अशी चूक करू नका
सुखी तुमच्या संसारा
आग उगा लावू नका ll ४ ll
देव छान मंदिरात
वा दिसे देवघरात
आणताच जीवनात
समजा गेला खड्ड्यात ll ५ ll
काम धंदा रोजगार
सारा सुटून जाईन
पैश्यापाण्याविना तुम्हा
भीक मागणे उरेन ll ६ ll
बायको पोरे मित्रादी
सारी दूर लोटतील
घेणाऱ्यांच्या जगात या
तुमचा कोण राहील ll ७ ll
पूजाअर्चा दानधर्म
कथा व्रते यात्रा करा
वरवर पण जरा
मनी देऊ नका थारा ll ८ll
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा