सोमवार, २२ एप्रिल, २०२४

आरसा

आरसा
******
तुझिया डोळ्यांनी मीच मला पाहतो
वादळ संवेदनांचे कणाकणो वाहतो 

कविता तुझ्यावरी  लिहून सुखी होतो 
तुला खुश करतो का मीच खुश होतो 

तू सुखाचा आरसा समोर माझ्या ठेवला 
सुखदुःखात तुझ्या माझाच चेहरा नटला 

हे असणे कुणासाठी हे नसणे कुणाविन 
ते चांदणे कुणातील मज वेढून रात्रंदिन

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लक्ष्य

लक्ष्य ***** माझी प्रकाशाची हाव  तुझ्या दारी घेई धाव  असे पतंग इवला  देई तव पदी ठाव  गर्द काळोख भोवती  जन्म खुणा न दिसती  आला कि...