मी आहे
*******
पुंज क्षणाचे मनात दिसले जणू अवसेला तारे तुटले ॥
प्रदीप्त मी पण नच मिटणारे
उंच टोक जणू ज्वालेवरले ॥
तीच लाट जणू पुढे धावते
पळ सातत्य खुळे वठवते ॥
सापेक्ष्याची परि ती किमया
कळणाऱ्याला हवी कळाया ॥
या क्षणातच मी पण असते
जगताचे गूढ द्वार उघडते ॥
माझ्या वाचून जे गीत उमटते
अस्तित्वाचे ते गुंजन असते ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा