सोमवार, ८ एप्रिल, २०२४

भांडे

फुटके भांडे
*****
फुटक्या भांड्याचा सोस भरण्याचा 
तैसा कळण्याचा मार्ग जीवा ॥
भांड्यावर भांडे पडूनिया भांडे 
भरेनाचि भांडे काही केल्या ॥१
सारे साचलेले सरुनिया जाता
ठणाणा कोरडा स्वर उरे ॥२
कळे भरण्याची व्यर्थ उठाठेव 
सरे धावाधाव मग त्याची ॥३
होईल लिंपण मोडीत वा जाण
ठाऊक प्राक्तन नसे कोणा ॥४
जाता भांडेपण विसरून भांडे 
शून्यातले धडे गिरवीत ॥५
आतले बाहेर एकच आकाश 
असण्याचा भास अस्तित्वाला ॥६
विक्रांत आकांत कळे भरण्याचा
येण्याचा जाण्याचा मार्ग नाही ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आस्थेचा दिवटा

आस्थेचा दिवटा ************ तुजला आवडे खुळा भक्तीभाव  तयाचा अभाव माझ्याकडे ॥१ देवा मी वाचले ग्रंथ ते अपार  तत्वज्ञानी थोर वारंवार...