खोके
*****
दत्ताच्या द्वारी आपटून डोके रिते कर खोके ज्ञानाचे ते ॥
अगा भरलेला आतमध्ये भुसा
कोण जाणे कसा ठासूनिया ॥
काही भिजलेला काही कुजलेला
काही घट्ट झाला कशाने तो ॥
कळत कधी वा कधी न कळत
राहिला भरत व्यर्थपणे . ॥
घेई भाव फुले ठेवी रे तयात
धुंद आसमंत करूनिया ॥
रोज होई रिक्त रोज होई मुक्त
महा शून्य भक्त परिपूर्ण ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा