अधिष्ठान
********
माझिया भक्तीची नको रे प्रचिती देऊस पावती दिगंबरा ॥१
काय हा व्यापार चाले व्यवहार
एक एकावर देणे घेणे ॥२
माझिया मनात नुठावे मागणे
ऐसे तैसे होणे कदा काळी ॥३
घडावे जगणे मध्यम मार्गाने
तुझिया पंथाने येणे जाणे ' ॥४
असावे अंतरी पूर्ण समाधान
तुझे वस्तीस्थान मनोहर ॥५
घडो हवा तर काही नामजप
काही ध्यान तप तुझी मर्जी ॥६
परीअधिष्ठान जावे न सुटून
विक्रांत मोडून पडू नये ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा