शिकार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिकार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०२६

शिकार


शिकारी
******"
ते असतात उभे राजरोस पणे 
हातात घेवून फासे 
अन् करतात 
कधी सावजाची शिकार 
कधी शिकाऱ्याची शिकार
कधी हकाऱ्याची शिकार 
अन् कधीतरी श्वापदचीही शिकार

खरंतर स्वापदच भरत असतात 
त्यांची पोट त्यांची खिसे 
त्यांचे घरदारही 
आणि केवळ 
फासे हातात दिसतात म्हणून 
तेच शिकारी नसतात 

अन त्या शिकारीचे वाटे 
पोहचावे लागतात त्यांना वरपर्यंत 
त्या फासाची मालक वेगळेच असतात 
आणि फासे मिळवण्यासाठीही 
टपलेले असतात अनेकजन 
अन हो त्या फासांचे भावही असतात 
लिलावही होतात.

फासापेक्षा सुद्धा 
फासाच्या जागाच महत्त्वाच्या असतात
रहदारी धावाधाव गडबड 
लुटालुट भांडाभांडी असेल ,
आणि भांडणारे असतील 
जितके गलेलठ्ठ चरबीयुक्त मालदार 
तेवढी अधिक मजा येते शिकारीला.

काय म्हणता 
ते प्रामाणिक कर्तव्यदक्ष 
समाज हितैषी वगैरे वगैरे 
असायला हवेत
अहो शब्दांना पण शिव्या लागतात .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

प्राणप्रिय

प्राणप्रिय ******* आज माझ्या ओठावरी  तुझे गाणे नाही जरी  काळजात पिळ खोल  वेदनांचे गाव उरी ॥१ बोलावून प्राणप्रिय  येणे तव झाले ना...