किनारा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
किनारा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०२६

झाड

झाड
****
या किनाऱ्याला 
मी चालत आहे 
मी माझ्यातच रुजत आहे 
मी झाड होत आहे 

इथले पाणी खोलवर 
माझ्या आत झिरपत आहे 
तोच मी जरी 
काही वेगळं घडत आहे 

पेशी पेशीत प्रत्येक 
तिचे अस्तित्व जाणवत आहे 
माझे पण कुठले आता 
जीवन हुंकारत आहे

नवी पालवी नवामोहर 
मजला खुणावत आहे 
नवी फळे नवा अर्थ 
अंतरात घटत आहे

गूढ चक्र जीवनाचे 
मजला समजत आहे 
हे झाड चालणारे 
रेवा तटी बहरत आहे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मागतो मी

मागतो मी ******** माझ्यासाठी तुझ्याकडे नच काही आराखडे  जाणतो मी थकलेला रुढार्थाने  सारे कसे इथे जीणे छान असे पाहतो मी भोगलेला  ह...