अभिनंदन रे
*************
करी नंदन रे
अभिनंदन रे
तुझा वंदन रे
शुरवरा ॥
केले खंडन रे
रिपू मर्दन रे
रण जिंकून रे
रणवीरा ॥
होय जय जय रे
सरे रिपू भय रे
मिळे अभय ये
मायदेशा॥
आला जिंकून रे
यश घेऊ न रे
उभा राहून रे
ताठ तेथे ॥
ऋणी भुमी रे
दे सलामी रे
गातो आम्ही रे
गुणगान ॥
लाखो विक्रांत
रे
ठेवती ह्रदयात रे
पाही प्रतिकात रे
तुज सदा
©
डॉ..विक्रांत
प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा