पूल पडतो
पाच जीव निष्पाप तरुण
जातांना घरी कामावरून
मरतात पूल पडून
भ्रष्ट कुणाच्या अदृष्य हातून
कॉन्ट्रॅक्टर
म्हणतो
हात वर करून
मेंटेनन्स नाही झाला
म्हणून
इंजिनिअर म्हणतो
की तक्रारच आली नाही म्हणून
तर रेल्वे प्रशासन
आमचा संबंधच नाही म्हणून
म्हणजे मग मेले ते
काय त्यांच्या कर्मांनं?
की जन्मजन्मांच्या पापानं?
निर्ढावलेले
भ्रष्ट राजकारणी
इंजिनिअर अन
कॉन्ट्रक्टर
असेच राहतील
सर्वदूर
बसलेले गाडलेल्या प्रेतांच्या
राबिटच्या ढिगांवर
त्यांना वाचवणारी यंत्रणा
नेहमीप्रमाणे चौकशी लावून
जाईल मोकळी होऊन
हे थांबेल असे वाटत नाही
मेलेल्या
आयांच्या पोरांचा टाहो
काही दिवसातच
विस्मृतीत जाईल
मीडियाही निवडणुकीच्या
बातम्यात मग्न
होईल
चौकशीतून
भ्रष्टाचारी
सुटलेले असतील
त्या आयांची
पोरेही
मोठे झालेले
असतील
अन निव्वळ एक
दुर्दैवी अपघात
म्हणून
ती फाईल दफ्तरी बांधली जाईल
पुन्हा एक ब्रिज
पडे पर्यन्त !
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
http://kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा