परानुभूती
*******
अधाशी मनाला
उन्मनी वाटली
नशा काही केली
दुसऱ्याची
परी काही केल्या
जाईना तो तोल
सरेना नि बोल
अडकला
फुकटची नशा
चढत नसावी
इथली असावी
रित काही
आणि खिसा खाली
नाहीं छण छण
कलाल कुठून
काय देई
जावे खाल मानी
इथून निघून
तोंड लपवून
ऐसे होते
झिंगल्याचा भास
हरवून जाता
तुज दारी दत्ता
पुन्हा आलो
चौदावीचे स्तन्य
देई मज दत्ता
तुर्येच्या अमृता
पान करी
उनाड विक्रांत
विकला प्रेमाला
तुझिया भेटीला
सारे करी
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा