मागणे ते नाही
फार
तुजवर दत्ता भार ॥
आर्त आहे माझी थोडी
फक्त देई तुझी गोडी ॥
दुनियेची सरो
गोठी
स्वरूपात राहू
दिठी॥
मोकलून साऱ्या
आशा
करी तुझा प्रेमा
पिसा ॥
रूप रस गंध नाद
हरवो रे तुझियात
॥
विक्रांतचा
अस्तित्वास
देई जाणिवेचा
ध्यास ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा