बुधवार, ३ एप्रिल, २०१९

स्वामी देवा




स्वामी देवा
*************
तुमच्या कृपेनी
जगतोय स्वामी
प्रेमाचे लेऊनी
देह वस्त्र

उणी माझी भक्ती
उणा माझा भाव
परि तू वर्षाव
कृपा मेघ ॥

दारी तुझ्या काही
घडली ना सेवा
प्रेमे परि देवा
कवळीले ॥

तुवा सांभाळले  
घरा बोलाविले
म्हटले आपले
माझा तु रे ॥

याहून अधिक
काय हवे जीवा
मिळताच ठेवा
कैवल्याचा ॥

विक्रांत उंडार
पदी असू द्यावा
मागे स्वामी देवा
हेची आता 

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

 श्री गुरुदेव दत्त 

******

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सूर्य

सूर्य  **** दिशा पेटवून सूर्य  होताच नामा निराळा  ती वाट दिगंतरीची  करुनी पायात गोळा ॥ ते स्वप्न चांदण्याचे त्याला कसे कळावे  मि...