दत्ताच्या
कृपेने
चालला हा जन्म
अन्यथा मरून
गेलो होतो ॥
घडते जगणे
दत्ताला स्मरत
प्रारब्धा जाळत
साठलेल्या ॥
काय केले पुण्य
सखे बाई मी ग
आनंदाचे जग
सारे झाले ॥
आता फक्त एक
मनात या हेत
पाहू डोळियात
छबी त्यांची ॥
मग हा विक्रांत
दत्त कीर्ती गंध
होऊन विश्वात
पसरेल ॥
॥अवधूत चिंतन
श्री गुरुदेव दत्त ॥
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा